Home क्राईम अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल ; संशयिताला अटक

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल ; संशयिताला अटक

0
21

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील एका गावात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलगी घरी एकटी असल्याची संधी साधून शेजारी राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणाने तिला आमिष दाखवत घराबाहेर बोलावले आणि गावातील स्मशानभूमी परिसरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या काकाने दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे कुटुंबीय काही कामानिमित्त जळगाव येथे नातेवाईकांकडे गेले होते. त्यामुळे १४ वर्षीय मुलगी घरी एकटी होती. ही बाब लक्षात घेऊन शेजारी राहणारा साबीर उर्फ आसिफ पिंजारी (वय २२) याने सोमवारी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास मुलीला आमिष दाखवून घराबाहेर बोलावले. त्यानंतर आरोपीने पीडित मुलीला गावातील स्मशानभूमी परिसरात नेले. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. घटना घडल्यानंतर आरोपीने मुलीला तिच्या घराजवळ सोडून तेथून पसार झाला.

दरम्यान, हा प्रकार पीडित मुलीच्या काकाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी मुलीकडे चौकशी केली. मुलीने घडलेला सर्व प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी तातडीने यावल पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. फिर्यादीच्या आधारे पोलिसांनी (पोक्सो) कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित साबीर उर्फ आसिफ पिंजारी याला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे करीत आहेत.


Protected Content

Play sound