Home Cities पारोळा बोहरा सेंट्रल स्कूल येथे १६०० विद्यार्थ्यांची दंत व मुख आरोग्य तपासणी 

बोहरा सेंट्रल स्कूल येथे १६०० विद्यार्थ्यांची दंत व मुख आरोग्य तपासणी 

0
22

पारोळा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पारोळा शहरातील एकमेव सीबीएसई संलग्न बोहरा सेंट्रल स्कूल येथे विद्यार्थ्यांच्या आरोग्य संवर्धनासाठी भव्य दंत व मुख आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. जवाहर मेडिकल फाउंडेशन डेंटल कॉलेज, धुळे आणि रोटरी क्लब, पारोळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात तब्बल १,६०० विद्यार्थ्यांची दंत व मुख आरोग्य तपासणी करण्यात आली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.

शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, भाजप मंडळ पारोळा अध्यक्ष अतुल पवार, रवी पाटील, भाजपचे शहर पदाधिकारी, संस्थेचे सचिव प्रकाश बोहरा, पारोळा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष रोहन मोरे, संजय शर्मा, आशा शर्मा, रोटरी क्लब पारोळाचे सचिव जगदीश आफ्रे, मुकेश गुजराथी तसेच डॉ. विलय शहा, डॉ. धीरज पाटील, डॉ. सचिन बडगुजर, डॉ. उन्मेश पाटील आणि डॉ. सोनम बोहरा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या तपासणीसाठी जवाहर मेडिकल फाउंडेशन डेंटल कॉलेज, धुळे यांच्या वतीने डॉ. ऋतुजा पवार यांच्या नेतृत्वाखाली सुमारे २० तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक कार्यरत होते. याशिवाय पारोळा शहरातील नामांकित दंतचिकित्सकांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. नर्सरीपासून दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांची दात, हिरड्या आणि मुख आरोग्याची सखोल तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने दात स्वच्छ ठेवण्याचे महत्त्व, नियमित ब्रश करण्याची सवय, संतुलित आहाराचे फायदे आणि मुख आरोग्याची काळजी घेण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तपासणीदरम्यान ज्या विद्यार्थ्यांमध्ये दातांशी संबंधित समस्या आढळून आल्या, त्यांना पुढील उपचारासाठी आवश्यक सल्ला आणि वैद्यकीय मार्गदर्शनही देण्यात आले. या शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये दंत आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होण्यास मोठी मदत झाली.

याच कार्यक्रमात शाळेच्या डायरेक्टर तथा गोल्ड मेडलिस्ट दंतचिकित्सक डॉ. सोनम बोहरा यांच्या दंतचिकित्साविषयक हस्तलिखित पुस्तकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्यामुळे कार्यक्रमाला विशेष आकर्षण लाभले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे चेअरमन सुरेंद्र बोहरा, प्राचार्या रियंका अरझारे, उपप्राचार्या स्मिनीला तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. तसेच जवाहर मेडिकल फाउंडेशनचे वैद्यकीय पथक, डेंटल कॉलेजचे प्राचार्य व डीन डॉ. अरुण डोडमानी आणि सहभागी सर्व दंतचिकित्सकांचे शाळा प्रशासनाने आभार मानले.


Protected Content

Play sound