Home आरोग्य ओपीडी पेपरच्या कोऱ्या बाजूवर ‘मोदी पर्व’; वासुदेव नेत्रालयाचा जनजागृतीचा अनोखा प्रयोग

ओपीडी पेपरच्या कोऱ्या बाजूवर ‘मोदी पर्व’; वासुदेव नेत्रालयाचा जनजागृतीचा अनोखा प्रयोग

0
17


वरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील ‘वासुदेव नेत्रालय’ पुन्हा एकदा आपल्या अनोख्या उपक्रमामुळे चर्चेत आले आहे. रुग्णांना दिल्या जाणाऱ्या ओपीडी केस पेपरच्या मागील कोऱ्या बाजूचा कल्पक वापर करत नेत्रालयाने सामाजिक जनजागृतीचा नवा आदर्श निर्माण केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर, या कोऱ्या कागदावर गेल्या १२ वर्षांतील केंद्र सरकारच्या महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती छापण्यात आली आहे.

नेत्रालयाचे संचालक डॉ. नितु पाटील आणि डॉ. रेणुका पाटील यांनी वैद्यकीय सेवेसोबतच समाजप्रबोधनाची जबाबदारीही जपली आहे. रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला उपचारासोबतच सामाजिक आणि राष्ट्रीय विषयांची माहिती मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

या ओपीडी पेपरच्या मागील बाजूस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील विविध महत्त्वपूर्ण निर्णय आणि योजनांची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये प्रधानमंत्री जन धन योजना, स्वच्छ भारत अभियान, सर्जिकल स्ट्राइक, नोटबंदी, वस्तू व सेवा कर (GST), आयुष्मान भारत योजना, कलम ३७० रद्द करणे, राम मंदिर निर्माण व विकास, नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA), डिजिटल इंडिया आणि उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना (PLI) यांसारख्या निर्णयांचा समावेश आहे. रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांना या माध्यमातून देशातील विविध घडामोडी आणि धोरणांची माहिती मिळत आहे. वैद्यकीय व्यवसायाच्या पलीकडे जाऊन सामाजिक आणि राष्ट्रीय विषयांवर जनजागृती करण्याचा हा प्रयत्न असल्याने वरणगाव तसेच पंचक्रोशीतील नागरिकांकडून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.


Protected Content

Play sound