Home धर्म-समाज आषाढी वारीपूर्वी मोठा निर्णय! 23 आणि 24 जूनला विठ्ठल-रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी बंद

आषाढी वारीपूर्वी मोठा निर्णय! 23 आणि 24 जूनला विठ्ठल-रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी बंद

0
6

पंढरपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा  । आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकरी आणि भाविकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर 23 आणि 24 जून रोजी सर्व प्रकारच्या दर्शनासाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. विठ्ठलाच्या मूर्तीची वाढती झीज रोखण्यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग (ASI) यांच्या मार्गदर्शनाखाली मूर्ती संवर्धन आणि संरक्षक लेपनाची प्रक्रिया करण्यात येणार आहे.


Protected Content

Play sound