पाचोरा- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील पत्रकार जावीद शेख यांना सापडलेला मोबाईल फोन त्यांनी मूळ मालकाला परत केल्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
पाचोरा तालुक्यातील सामनेर येथील योगेश पाटील हे ११ जुन रोजी पाचोरा उपविभागीय अधिकारी कार्यालयात आयोजित जनसमाधान अभियानात समस्या घेवुन आले होते. दरम्यान अर्ज भरत असताना त्यांचा मोबाईल अनावधानाने कुठंतरी राहुन गेला. योगेश पाटील हे सर्वत्र हरविलेला मोबाईल शोधत होते.

या ठिकाणी जाविद शेख हे पत्रकार वृत्तांकन करण्यासाठी आले होते. त्यांना योगेश पाटील यांचा मोबाईल गवसला. जाविद शेख यांनी प्रामाणिकपणा दाखवत मोबाईल थेट पोलिस स्टेशनमध्ये जमा केला. दरम्यान योगेश पाटील यांना कळल्यानंतर पोलिसांनी शहानिशा करुन जाविद शेख यांच्या हस्ते योगेश पाटील यांना मोबाईल सुपुर्द केला. यामुळे जाविद शेख यांचे प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.



