Home Cities जळगाव जळगावात ‘एक पेड़ देश के नाम’ उपक्रम ; विविध ठिकाणी वृक्षारोपण

जळगावात ‘एक पेड़ देश के नाम’ उपक्रम ; विविध ठिकाणी वृक्षारोपण

0
1


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत भारतीय जनता पक्ष जळगाव जिल्हा महानगरतर्फे ‘एक पेड़ देश के नाम’ या संकल्पनेअंतर्गत शहरातील विविध भागांमध्ये वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन उपक्रम राबविण्यात आला. पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात या अभियानात सहभाग नोंदविला.

५ जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे आणि भाजप महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ क्रमांक १ ते ५ मधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी वृक्षारोपण केले. यावेळी केवळ झाडे लावण्यापुरते मर्यादित न राहता त्यांचे संगोपन आणि संवर्धन करण्याचाही संकल्प करण्यात आला.

मंडळ क्रमांक १ अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज मंडळाच्या वतीने प्रजापतनगर, मामुराबाद रोड परिसरात विशेष वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला. पर्यावरण दिनाचे सहसंयोजक राजू मराठे, मंडळाध्यक्ष आनंद सपकाळे, सरचिटणीस राहुल सनकत, नगरसेवक निलेश तायडे, पूजा जगताप, विजय बांदल, संदीप ढढोरे, महेश चौधरी, संजय शिंदे, राहुल घोरपडे, तुषार सूर्यवंशी, दीपक कोळी, नितीन साळुंखे, वसीम शेख, संगीता पाटील, चित्रा मालपाणी आणि राजश्री सोनवणे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

मंडळ क्रमांक ३ मध्येही ‘एक पेड़ देश के नाम’ अभियानांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी आमदार राजूमामा भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, नगरसेविका उज्वलाताई बेंडाळे, जिल्हा सरचिटणीस नितीन इंगळे, नगरसेवक नितीन सपके, नितीन बरडे, सुरेखा तायडे, गायत्री राणे, मंडळाध्यक्ष अजित राणे, दीपक परदेशी, संयोजक जितेंद्र चव्हाण यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षसंवर्धनाची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. वाढते प्रदूषण, तापमानवाढ आणि बदलते हवामान यावर प्रभावी उपाय म्हणून वृक्षारोपणाकडे पाहिले जाते. याच पार्श्वभूमीवर भाजप महानगरतर्फे राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला कार्यकर्त्यांसह नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती निर्माण करण्याबरोबरच प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे, असा संदेश देण्यात आला. ‘एक पेड़ देश के नाम’ अभियानाच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणासाठी सामूहिक जबाबदारीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.


Protected Content

Play sound