Home राष्ट्रीय डिजिटल अरेस्टच्या वाढत्या फसवणुकीला लगाम; ‘अभय’ चॅटबॉट लॉन्च !

डिजिटल अरेस्टच्या वाढत्या फसवणुकीला लगाम; ‘अभय’ चॅटबॉट लॉन्च !

0
100

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । डिजिटल अरेस्ट, बनावट सरकारी नोटिसा आणि सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे देशभरात चिंता वाढत असताना Central Bureau of Investigation ने नागरिकांसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. CBIने ‘ABHAY’ नावाचा AI आधारित हेल्पबॉट सुरू केला असून, त्याच्या मदतीने CBIच्या नावाने पाठवण्यात आलेल्या नोटिसांची ऑनलाइन पडताळणी करता येणार आहे. वाढत्या डिजिटल अरेस्ट घोटाळ्यांच्या पार्श्वभूमीवर हे साधन नागरिकांसाठी एक प्रकारचे डिजिटल संरक्षण कवच ठरणार असल्याचे मानले जात आहे.


Protected Content

Play sound