Home Cities जळगाव विधान परिषद निवडणूक : जळगाव जिल्ह्यात आचारसंहिता लागू !

विधान परिषद निवडणूक : जळगाव जिल्ह्यात आचारसंहिता लागू !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र विधान परिषद दिवार्षिक निवडणूक २०२६ ची घोषणा करण्यात आली असून जिल्ह्यात आजपासून २५ जून २०२६ पर्यंत निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून तिची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक शाखेतर्फे प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष, उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे तसेच महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टी अॅक्ट १९९५ अंतर्गत नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

आचारसंहितेनुसार कोणत्याही सार्वजनिक किंवा खाजगी मालमत्तेवर विनापरवाना पोस्टर्स लावणे, भित्तीलेखन करणे, निवडणूक चिन्हे रंगविणे, झेंडे किंवा कापडी फलक लावणे तसेच इतर कोणत्याही प्रकारे मालमत्तेचे विद्रुपीकरण करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. प्रशासनाने अशा प्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथके नियुक्त केली असून नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

प्रशासनाने नागरिकांनाही सहकार्याचे आवाहन केले असून कोणत्याही बेकायदेशीर प्रचार साहित्याची माहिती तात्काळ प्रशासनाला देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टी अॅक्ट १९९५ अंतर्गत मालमत्तेचे विद्रुपीकरण केल्यास संबंधित व्यक्तीस तीन महिन्यांपर्यंत कारावास, दोन हजार रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात, असा इशाराही जिल्हा निवडणूक शाखेने दिला आहे.


Protected Content

Play sound