Home क्राईम भंगार दुकानाला भीषण आग : किरकोळ सामानांचे नुकसान !

भंगार दुकानाला भीषण आग : किरकोळ सामानांचे नुकसान !


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरातील एका भंगार दुकानाला अचानक आग लागल्याची घटना सोमवारी ११ मे रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. महापालिकेच्या अग्निशमन विभागातील दोन बंबांनी ही आग आटोक्यात आणण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नसून शेजारी असलेले फर्निचर दुकान हे मात्र थोडक्यात बचावले आहे.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील गेंदलाल मिल परिसरातील भोंग्याजवळ महानगरपालिकेचे मार्केट आहे. या मार्केटमधील दुकान नंबर ८७ हे निसार खान यांचे आहे. त्यांच्या असलेल्या या भंगार दुकानाला आज सोमवारी ११ मे रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. दरम्यान ही आग लागल्यानंतर जळगाव महानगरपालिकेचे अग्निशमनचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शर्तीचे प्रयत्न करूनही आग आटोक्यात आणली त्यांच्याच प्रयत्नामुळे शेजारी असलेल्या फर्निचर दुकान मात्र थोडक्यात बचावले आहे. या घटनेत सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही. या घटने संदर्भात अद्यापपर्यंत पोलिस ठाण्यात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही.

ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रभारी मुख्य अग्निशमन अधीक्षक अश्वजीत घरडे यांच्या मार्गदर्शनाखाली चालक युसुफ पटेल, फायरमन सौरभ चित्ते, विठ्ठल पाटील, तेजस बडगुजर, पन्नालाल सोनवणे, अनिल गायकवाड, गौरव पाटील, विशाल पाटील यांच्या सहकारी स्थानिक नागरिकांनी यावेळी आटोक्यात आणण्यासाठी सहकार्य केले.


Protected Content

Play sound