Home क्रीडा आयपीएलमध्ये ‘रील संस्कृती’वर बीसीसीआयचा लगाम; नियम मोडल्यास दंडासह होणार कारवाई

आयपीएलमध्ये ‘रील संस्कृती’वर बीसीसीआयचा लगाम; नियम मोडल्यास दंडासह होणार कारवाई


मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । इंडियन प्रीमियर लीग (IPL) दरम्यान खेळाडू, त्यांचे कुटुंबीय, समालोचक आणि ब्रॉडकास्टरसाठी काम करणाऱ्या माजी क्रिकेटपटूंवर आता सोशल मीडियावरील कंटेंट पोस्ट करण्याबाबत कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) भ्रष्टाचारविरोधी आणि सुरक्षा कारणास्तव नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोठा दंड आणि कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.

 


Protected Content

Play sound