Home क्राईम धक्कादायक ! जळगावात पत्नीनेच पतीचा गळा आवळून केला खून

धक्कादायक ! जळगावात पत्नीनेच पतीचा गळा आवळून केला खून


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात एक धक्कादायक खून प्रकरण उघडकीस आले असून, पत्नीनेच पतीचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मनीषा भारत पाटील (वय ४५) हिने तिचा पती भारत पाटील (वय ५०) याचा दोरीने गळा आवळून खून केल्याचे पोलिसांसमोर मान्य केले आहे. मयत भारत पाटील हा मद्यपानाच्या व्यसनाधीन होता तसेच तो कर्जबाजारी असल्याने घरातील आर्थिक परिस्थिती ढासळली होती. परिणामी, कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी पत्नीवर येऊन पडली होती.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, पतीकडून होणाऱ्या सततच्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून आरोपीने रात्रीच्या सुमारास हे टोकाचे पाऊल उचलले. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला व शवविच्छेदनासाठी पाठवला.

शवविच्छेदन अहवालानुसार, गळा आवळल्यामुळे श्वास गुदमरून भारत पाटील यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी जळगाव शहर पोलिसांनी आरोपी मनीषा पाटील हिला अटक केली असून, अधिक तपास सुरू आहे.या घटनेमुळे कौटुंबिक तणाव, आर्थिक अडचणी आणि व्यसनाधीनतेचे गंभीर परिणाम पुन्हा एकदा समोर आले असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


Protected Content

Play sound