Home Cities यावल यावलमध्ये भाजपाला मोठा धक्का : शहराध्यक्ष राहुल बारी यांचा सहकाऱ्यांसह शिवसेना शिंदे...

यावलमध्ये भाजपाला मोठा धक्का : शहराध्यक्ष राहुल बारी यांचा सहकाऱ्यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल शहरातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणारी घटना घडली असून भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष राहुल बारी यांनी पक्षाला सोडचिट्टी देत आपल्या समर्थकांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. या घडामोडीमुळे स्थानिक राजकारणात नवीन समीकरणे तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राहुल बारी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत हा निर्णय घेतल्याचे सांगितले. यावल येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हा प्रमुख समाधान महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. बारी यांच्या या निर्णयामुळे भाजपाच्या स्थानिक संघटनात्मक पातळीवर मोठा परिणाम होण्याची चर्चा सुरू झाली आहे.

या प्रवेशावेळी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख पंकज बारी, यावल तालुका प्रमुख राजू काटोके, शिवसेना युवकचे अजय तायडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी नव्या सदस्यांचे स्वागत करत आगामी निवडणुकांमध्ये संघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला.

राहुल बारी यांच्या या पक्षांतरामुळे यावलमधील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत असून आगामी काळात आणखी काही पदाधिकारी पक्षबदल करू शकतात, अशी चर्चा रंगू लागली आहे. स्थानिक पातळीवर याचा थेट परिणाम निवडणुकीतील समीकरणांवर होणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.


Protected Content

Play sound