Home Uncategorized जुन्या वादातून तरुणावर चॉपरने जीवघेणा हल्ला; एकाला अटक

जुन्या वादातून तरुणावर चॉपरने जीवघेणा हल्ला; एकाला अटक


चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील धानोरा येथे जुन्या वादाची कुरापत काढून एका २२ वर्षीय तरुणावर चॉपरने प्राणघातक हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकाला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश गुलाब सोनवणे (वय २२, रा. कोळीवाडा, धानोरा) आणि आरोपी यांच्यात ५ एप्रिल रोजी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास धानोरा येथील ‘शिवतांडव टी हाऊस’ येथे वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरून, संशयित आरोपी गणेश हिम्मत कोळी, जितेंद्र गोपीचंद कोळी, भूषण लोदू कोळी, गौरव कोळी आणि वैभव भोई (सर्व रा. धानोरा व मोहाडी) यांनी गणेश याला धानोरा चौकातील सार्वजनिक ठिकाणी गाठले. जुन्या वादाचे निमित्त साधून गणेश कोळी याने आपल्या हातातील धारदार चॉपरने गणेश सोनवणे याच्या पोटावर, डाव्या कोपऱ्यावर आणि पाठीवर सपासप वार केले. यावेळी त्याच्यासोबत असलेल्या इतर पाच साथीदारांनीही गणेशला बेदम मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात तो जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अडावद पोलिसांनी आरोपी गणेश हिम्मत कोळी, जितेंद्र गोपीचंद कोळी, भूषण लोदू कोळी, गौरव कोळी आणि वैभव भोई (सर्व रा. धानोरा व मोहाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रसंगी सपोनि प्रमोद वाघ हे करीत आहे. यातील मुख्य संशयित आरोपी गणेश कोळी अटक करण्यात आली.


Protected Content

Play sound