Home क्राईम जळगावातून अल्पवयीन मुलीचे अपहरण; नातेवाईकांची तक्रार

जळगावातून अल्पवयीन मुलीचे अपहरण; नातेवाईकांची तक्रार


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच, जळगाव शहरातील गजबजलेल्या रिंग रोड भागातून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एका भागात अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान रविवारी १४ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेच्या दरम्यान रिंगरोडवरील दत्तकॉलनी परिसरातील एका क्लासेसमधून पिडीत मुलीला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर पिडीत मुलीच्या पालकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला पंरतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर तिच्या पालकांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शांताराम देशमुख हे करीत आहे.


Protected Content

Play sound