Home Cities अमळनेर अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले; गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले; गुन्हा दाखल

0
154

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना ११ मार्च रोजी उघडकीला आली आहे. याबाबत राविवारी १५ मार्च रोजी दुपारी दीड वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील एका गावात चौदा वर्षीय अल्पवयीन आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ११ मार्च रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास पिडीत मुलगी ही घरी असतांना अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले. हा प्रकार समोर आल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर तिच्या पालकांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुंढील तपास पोलीस उपनिरीक्षक कविता ठाणगे ह्या करीत आहे.


Protected Content

Play sound