Home क्रीडा भारताचा विश्वविजय : अंतिम लढतीत न्यूझीलंडला धूळ चारली!

भारताचा विश्वविजय : अंतिम लढतीत न्यूझीलंडला धूळ चारली!


अहमदाबाद-वृत्तसेवा | येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या टि-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतीम फेरीत आज टिम इंडियाने न्यूझीलंडचा दारूण पराभव करत लागोपाठ दुसऱ्यांना विजेतेपद पटकावण्याचा विश्वविक्रम केला. आज फलंदाजांनी जोरदार कामगिरी केल्यानंतर गोलंदाजांनी देखील चमकदार कामकिरी केल्याने हा विजय साकार झाला.

आज न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला पहिल्यांदा फलंदाजी दिली. मात्र त्यांचा हा निर्णय सपशेल चुकला. अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी भारताला दमदार सुरुवात करून दिली. भारताने डावाची उत्कृष्ट सुरुवात करत पहिला विकेट 98 धावांवर गमावला. अभिषेक शर्मा 7.1 षटकात रचिन रवींद्र याच्या गोलंदाजीवर टिम सायफर्ट यांच्या हाती झेल देऊन बाद झाले. अभिषेक याने 21 चेंडूत 52 धावा केल्या असून त्यात 6 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता.

संजू सॅमसन मात्र पुन्हा एकदा शतक पूर्ण करण्यात अपयशी ठरला. त्याने 46 चेंडूत 89 धावांची शानदार खेळी केली. या डावात 5 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश होता. ते 15.1 षटकात जेम्स नीशम यांच्या गोलंदाजीवर सीमारेषेजवळ उभ्या असलेल्या कोल मॅककॉन्की याच्या हाती झेल देऊन बाद झाला.

ईशान किशन 15.5 षटकात नीशम याच्या गोलंदाजीवर मार्क चॅपमन यांच्या हाती झेल देऊन बाद झाला. ईशान याने 25 चेंडूत 54 धावा केल्या असून त्यात 4 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. त्यानंतर 15.6 षटकात नीशम याने सूर्यकुमार यादव यांना पहिल्याच चेंडूवर बाद केले. सूर्यकुमार यादव याने षटकार मारण्याचा प्रयत्न केला; मात्र सीमारेषेजवळ रचिन रवींद्र यांच्या हाती त्यांचा झेल गेला.

भारताला शेवटचा धक्का हार्दिक पांड्या यांच्या रूपाने बसला. तो 18.2 षटकात 13 चेंडूत 18 धावा करून बाद झाला. मॅट हेन्री यांच्या गोलंदाजीवर मिचेल सॅन्टनर यांनी त्यांचा झेल घेतला. अखेरीस शिवम दुबे (26 धावा) आणि तिलक वर्मा (8 धावा) नाबाद परतले. या आव्हानाला उत्तर देतांना त्यांची सुरूवात डळमळीत अशीच झाली. तिसऱ्या षटकातच अक्षर पटेल याने फिन एलन याला बाद केले. यानंतर जसप्रीत बुमराह याने आपल्या स्पेलच्या पहिल्याच चेंडूवर रचीन रवींद्रला बाद करून न्यूझीलंडला मोठा धक्का दिला. यानंतर पुन्हा अक्षर पटेल याने चमकदार कामगिरी करत ग्लेन फिलीप याला तंबूत पाठवत आपला दुसरा बळी मिळविला. टिम सायफर्ट याने फटकेबाजी करून आपल्या संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. तथापि, मार्क चॅपमनला हार्दीक पांड्या याने बाद केले. यानंतर वरूण चक्रवर्ती याने सायफर्टला 52 धावांवर बाद केले. यानंतर अडचणीत आलेल्या न्यूझीलंडचा डाव शेवटपर्यंत सावला नाही. आणि हा संघ 159 इतक्या धावाच करू शकला.


Protected Content

Play sound