Home Cities अमळनेर डॉ. आंबेडकर पुतळ्यासमोर भव्य प्रवेशद्वारास शासन मंजुरी ; ५० लाखांचा निधी मंजूर

डॉ. आंबेडकर पुतळ्यासमोर भव्य प्रवेशद्वारास शासन मंजुरी ; ५० लाखांचा निधी मंजूर


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरासाठी आणि समाजासाठी अभिमानास्पद ठरणारा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आला असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भव्य प्रवेशद्वार उभारण्यास अधिकृत मंजुरी मिळाली आहे. या निर्णयामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून सामाजिक स्तरावरही आनंद व्यक्त केला जात आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषद यांच्या सर्व पदाधिकारी व समाजबांधवांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा प्रस्ताव मार्गी लागला आहे. माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे शासन दरबारी या कामास हिरवा कंदील मिळाला. वर्षभरापूर्वी परिषद पदाधिकाऱ्यांनी आमदारांकडे लेखी निवेदन सादर करून पुतळ्यासमोर प्रवेशद्वार उभारण्याची मागणी केली होती. त्यानंतर या मागणीचा सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.

अध्यक्ष नरेंद्र संदानशिव, अॅड. एस.एस. ब्रह्मे, प्रा. विजय तूंटे, प्रा. हर्षवर्धन जाधव, प्रा. विजय खैरनार, प्रा. राहुल निकम, प्रा. माधव भुसणार, प्रा. भानुदास गुलाले, प्रा. जितेंद्र संदानशिव, प्रा. विजय वाघमारे, प्रा. रवि बावस्कर, बौद्धाचार्य बापुराव संदानशिव, बौद्धाचार्य निकम, बौद्धाचार्य अरुण घोलप, बौद्धाचार्य डी. आर. सैंदाणे, बौद्धाचार्य मैराळे, आयु. राजू भालेराव, अर्जुन कढरे, अॅड. प्रशांत संदानशिव, विजय संदानशिव, किरण संदानशिव, विनोद बिऱ्हाडे, ज्ञानेश्वर संदानशिव, संजय बिऱ्हाडे, गोकुळ बिऱ्हाडे, समाधान बिऱ्हाडे, गोपीचंद चव्हाण, भरत सोनवणे, सतीश सोनवणे, गौतम सोनवणे, मंगल सपकाळे, दिनेश बिऱ्हाडे, सुरेश वानखेडे, चंद्रकांत संदानशिव, भरत सरदार, सिद्धार्थ मोरे, अशोक महाजन संदानशिव, प्रा. कृष्णा संदानशिव, आकाश संदानशिव, राजेंद्र संदानशिव, शांताराम संदानशिव, शुभम घोलप आदींसह अनेक समाजबांधवांनी या उपक्रमासाठी सक्रिय भूमिका बजावली. या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे प्रस्तावाला गती मिळाली.

दिनांक २४ जुलै २०२४ रोजी शासन स्तरावर प्राथमिक मंजुरी मिळाली होती. त्यानंतर २९ डिसेंबर २०२५ रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या प्रकल्पासाठी तब्बल ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे. दिनांक १८ फेब्रुवारी २०२५ रोजी या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या दिशेने ठोस पाऊल उचलण्यात आले असल्याचे परिषदेतर्फे सांगण्यात आले.

या ऐतिहासिक निर्णयामागे माजी नगरसेवक नरेंद्रभाऊ संदानशिव यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा मोठा वाटा असल्याचे सांगण्यात येत आहे. आमदार अनिल पाटील यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे हे स्वप्न साकार झाले असून अमळनेर परिसराच्या सामाजिक आणि सांस्कृतिक ओळखीला अधिक बळकटी मिळणार आहे. प्रवेशद्वार उभारणीमुळे पुतळा परिसराचे सौंदर्य वाढण्यासोबतच सार्वजनिक वारसा जतन करण्यासही मदत होणार आहे.

दरम्यान, हा निर्णय समाजाच्या भावनांचा आदर करणारा आणि सकारात्मक पाऊल असताना काही व्यक्तींनी गैरसमज निर्माण करून श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्याची खंत सामाजिक परिषदेतर्फे व्यक्त करण्यात आली आहे. खोट्या प्रचाराला थारा देऊ नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound