फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । आमदार हरीभाऊ जावळे यांच्या प्रयत्नांतून रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातील सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हापरीषद बांधकाम विभाग अंतर्गत येणार्या महत्वाच्या रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे.
रावेर-यावल मतदारसंघातील मंजूर असलेल्या रस्त्यांची निविदा प्रकिया तत्काळ पूर्ण झाल्यानंतर थोड्याच दिवसात या रस्त्यांच्या कामास सुरुवात करण्यात येणार आहे. याच्या अंतर्गत रावेर तालुक्यातील मंजूर झालेले रस्ते पुढील प्रमाणे आहेत. अहिरवाडी ते पाडले रस्ता डांबरीकरण करण- ८४.८२ लक्ष; लोहारा ते कुसुंबा रस्ता डांबरीकरण करणे- ३२.०० लक्ष; कळमोदा ते फैजपूर रस्ता डांबरीकरण करणे- ६२.०० लक्ष; निंभोरा फाटा ते निंभोरा रस्ता डांबरीकरण करणे- ४७ लक्ष; केर्हाळे ते अहिरवाडी रस्ता डांबरीकरण करणे- १००.०० लक्ष; तामसवाडी रेल्वे गेट ते मोरगाव रस्ता डांबरीकरण करणे- ६५ लक्ष; चिनावल ते विवरा रस्ता डांबरीकरण करणे- ११६.४७ लक्ष; गौरखेडा फाटा ते कुंभारखेडा ते चिनावल ते वाघोदा प्रजीमा-७३ रस्ता डांबरीकरण करणे- २४० लक्ष तसेच भोकरी ते तामसवाडी ते खिरवड ते नेहेते ते दोधे ते अटवाडा प्रजीमा-७० रस्ता डांबरीकरण करणे- ५२५.०० लक्ष आदी रस्ते यात मंजूर करण्यात आले आहेत.
तर यावल तालुक्यातील बामणोद ते चिखली रस्ता (जुना आग्रा रोड) डांबरीकरण करणे ता.यावल- ९८.०० लक्ष; पिंपरूड ते विरोदा ते वढोदा ते दुसखेडा प्रजीमा-७७ रस्ता डांबरीकरण करणे ता.यावल- २३५.०० लक्ष; प्रजिमा-७० वर खिरवड गावाजवळ पुलाचे बांधकाम करणे- २८ लक्ष; यावल ते भुसावळ रस्ता रामा-४३ मजबुतीकरण व डांबरीकरण करणे- ५०० लक्ष; यावल ते अट्रावल व हरीपूरा ते वड्री रस्ता प्रजिमा-११ मजबुतीकरण व डांबरीकरण करणे- ३०० लक्ष; आमोदा ते विरोदा रस्ता प्रजीमा-१५ ची सुधारणा करणे- ६७.२० लक्ष; टाकरखेडा ते रामा-४३ व न्हावी ते कळमोदा रस्ता प्रजिमा-५८ मजबुतीकरण व डांबरीकरण करणे- १३६ लक्ष. या माध्यमातून रावेर-यावल मतदार संघात मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे काम मार्गी लागणार आहे.