मुंबई प्रतिनिधी । केंद्र सरकारने आता शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांनाही सातवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा केली आहे.
लोकसभा निवडणुकीआधी केंद्र सरकार एका मागून एक लोकप्रिय घोषणांचा वर्षाव करत आहेत. या अनुषंगाने आता शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांनाही आता सातवा वेतन आयोग लागू होणार आहे. केंद्र सरकारने यासंबंधीचा प्रस्ताव मंजूर केला आहे. यासाठी केंद्राच्या तिजोरीवर १ हजार २४१ कोटींचा भार पडणार आहे. मात्र, याचा लाभ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना मिळणार आहे. त्याचबरोबर देशातील पदवी स्तरावरील तांत्रिक शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांनाही याचा लाभ मिळणार आहे.