मतदानावेळी पश्चिम बंगालमध्ये हिंसा ; सीआयएसफच्या गोळीबारात पाच ठार

 

 

कोलकाता:  वृत्तसंस्था । पश्चिम बंगालमध्ये चौथ्या टप्प्यासाठी मतदान सुरू असतानाच हिंसेचं गालबोट लागलं. कुचबिहारच्या शीतलकुचीमध्ये सीआरपीएफच्या जवानांनी केलेल्या गोळीबारात पाच जण ठार झाले आहेत.

 

मतदानासाठी रांगेत उभे असलेल्या आनंद बर्मन या 18 वर्षीय तरुणाला गोळी लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचंही वृत्त आहे.  सीआयएसएपच्या जवानांचे शस्त्र हिसकावून घेण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला. त्यामुळे जवानांनी जमावाला पांगवण्यासाठी केलेल्या गोळीबारात पाच जणांचा मृत्यू झाला

 

सीआयएसएफच्या जवानांनी केलेल्या गोळीबारात पाचही तरुणांचा मृत्यू झाला आहे, असा आरोप टीएमसीने केला आहे. पाचही मृतदेह माथाभांगा रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत.  या परिसरात तणाव निर्माण झाला आहे. निवडणूक आयोगाने याबाबतचा अहवालही मागवला आहे. गोळीबार करण्यात आला तेव्हा काय परिस्थिती होती, गोळीबार का करावा लागला, गोळीबार करणं गरजेचं होतं का? याबाबतची माहिती  निवडणूक आयोगाने मागितली आहे.

 

या हिंसेनंतर टीएमसीने आरोप केले आहेत. भाजपचे कथित कार्यकर्ते लोकांना मतदान करण्यापासून रोखत आहेत. सीआरपीएफचे जवान भाजपला मतदान करण्यासाठी दबाव टाकत आहेत.  दोन गटांमध्ये हिंसा भडकली होती. त्यांना पांगवण्यासाठी सीआएसएफच्या जवानांनी गोळीबार केला. या जवानांच्याकडील शस्त्र हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला गेला होता. पोलिंग अधिकाऱ्यालाही मारहाण करण्यात आली होती,

 

राज्यातील हावडा, दक्षिण 24 परगना, हुगली, कुचबिहार आणि अलीपुरद्वार या पाच जिल्ह्यातील 44 जागांसाठी आज मतदान होत आहे. चौथ्या टप्प्यात एकूण 373 उमेदवार रिंगणात आहेत.

Protected Content