पोस्ट ग्रॅज्युएट महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळाव्यात वार्षिक नियतकालिक “स्फटिक” चे अनावरण

PG COLLEGE vidyarthi melava

जळगाव, प्रतिनिधी | के. सी. ई. सोसायटीच्या , पोस्ट ग्रॅज्युएट कॉलेज ऑफ सायन्स टेक्नॉलॉजी आणि रिसर्चचे वार्षिक नियतकालिक “स्फटिक” चे अनावरण मराठीचे प्रसिद्ध साहित्यिक  डॉ. किसनराव पाटील यांचे हस्ते नुकतेच करण्यात आले.  अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एस. झोपे व प्रमुख संपादक डॉ. एस. एस. बारी तसेच संपादकीय सदस्य  उपस्थित होते.

डॉ. किसनराव पाटील यांनी आपल्या मनोगतात नियतकालिकाचे महत्व विषद करून विद्यार्थ्यांना आपल्यातील सुप्त लेखक, कवी, कलाकार प्रकट करून आपले साहित्य “स्फटिक” च्या माध्यमातून प्रसिद्ध करावे असे आवाहन केले.  यावेळी प्राचार्य डॉ. व्ही. एस. झोपे यांनी स्फटिक हे नियतकालिक प्रकाशित करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे कौतुक केले.  त्यात डॉ. एस. एस. बारी यांनी घेतलेल्या परीश्रमाबद्दल त्यांचे पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले.    डी. आर. न्हावी यांनी स्फटिक मध्ये असलेल्या साहित्याचा व माहितीचा घोषवारा दिला.    ‘स्फटिक’ नियतकालीकाचे अनावरण शिक्षक दिनाचे औचीत्य साधून करण्यात आल्यामुळे सर्व कार्यक्रमांची सूत्रे विद्यार्थ्यांनी सांभाळली.  त्यात ललिता बडगुजर, कांचन झांबरे, नेहा भामरे, यांनी उत्कृष्टरित्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  केले. शिक्षक दिनानिमित्त सरीता शर्मा (गणीत), ललीत पाटील (केमेस्ट्री), जयेश पाटील (मायोक्रोबायोलॉजी) व माधुरी पाटील (केमेस्ट्री) ह्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत मांडले. यशस्वीतेसाठी विद्यार्थी, महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Protected Content