निवडणूक काळात खाजगी इंजिनिअर्सकडून ईव्हीएम मशीनची हाताळणी ; ‘द क्विंट’चा गौप्यस्फोट

 

EVM.jpg.15186720b5e46b3d2f0f9be1c31ee467

मुंबई (वृत्तसंस्था) मतमोजणीतील तफावतसह ईव्हीएमशी संबंधित अनेक गंभीर मुद्द्यांवर शोधपत्रकारिता करणाऱ्या ‘द क्विंट’ या वेबसाईटने पुन्हा एकदा खळबळजनक खुलासे केले आहेत. यानुसार निवडणूक काळात खाजगी इंजिनिअर्सकडून ईव्हीएम मशीनची हाताळणी केली गेलीय. एवढेच नव्हे तर, हे इंजिनिअर्स देखरेखीचे काम करणाऱ्या कंपनीच्या अधिकृत वेंडरांच्या यादीतील नाहीय.

 

‘क्विंट’ ने आपल्या वृत्तात म्हटलेय की,निवडणूक आयोगासाठी ईव्हीएम मशीन बनविणारी इसीआयल (ECIL) अर्थात The Electronics Corporation of India Limited या कंपनीच्या मान्यता प्राप्त वेंडरांच्या यादीत M/s T&M सर्विसेस कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी नाहीय. ही कंपनी ईव्हीएम मशीनांची निवडणूक आयोगासाठी देखरेखीसाठी खाजगी इंजिनिअर पुरवणारी कंपनी आहे. यामुळे खाजगी इंजिनिअरांच्या ताब्यात मशीन असल्यानंतर तुमचे-माझे मत किती सुरक्षित आहे?

 

क्विंट वेबसाईटने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. सुरुवातील निवडणूक आयोग म्हणत होते की, निवडणुकीच्या काळात ईव्हीएम आणि व्हीव्हीटीपॅट कोणत्याही खाजगी इंजीनियर्स हात लागलेला नाहीय. त्यानंतर क्विंटने खुलासा केला होता की, निवडणूक आयोगाने ईव्हीएम आणि व्हीव्हीटीपॅटच्या दुरुस्तीसाठी खाजगी कंपनीला कंत्राट दिला होता.

 

क्विंट वेबसाईटने आज पुन्हा नवीन बातमी दिलीय की, निवडणूक आयोगासाठी ईव्हीएम आणि व्हीव्हीटीपॅटच्या देखरेखीचे काम करणारी कंपनी M/s T&M सर्विसेस कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी ECIL च्या मान्यताप्राप्त वेंडरच्या यादीमध्ये नाहीय. ECIL ने आपल्या वेबसाईटवर २०१५ पासून मान्यताप्राप्त वेंडरांची यादी टाकलेली आहे. त्यात M/s T&M सर्विसेस कंपनीचे नाव नाहीय. मग प्रश्न असा उपस्थित होतो की, ECIL ने गैरमान्यता प्राप्त कंपनीकडून निवडणुकीचे काम का करून घेतले? विशेषत: ईव्हीएम आणि व्हीव्हीटीपॅट मशीनचे देखरेखीसारखी अतिमहत्वपूर्ण काम.

 

क्विंटने आणखी एक महत्वपूर्ण आणि तेवढीच धक्कादायक माहिती उघड केलीय. यानुसार ईव्हीएमच्या देखरेखीसाठी लावण्यात आले होते. ते ECIL नव्हे तर T&M सर्व्हिसेसच्या पगारावर काम करत होते. परंतु निवडणूक आयोगाचे पूर्व मुख्य निवडणूक आयुक्त एस.वाय.कुरेशी यांनी माहिती देतांना सांगितले होते की, ईव्हीएम मशीनच्या पहिल्या पायरीच्या चाचणीसाठी फक्त BEL आणि ECIL या कंपनीच्या पगारावर काम करणाऱ्या इंजिनिअरांनाच नियुक्त करण्यात आलेले आहे.

 

भारतात नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये सुरुवातपासून तर शेवटपर्यंत ईव्हीएम मशीनपर्यंत खाजगी इंजिनिअरची पोहच सुरक्षेच्या दृष्टीने मोठी चूक नाहीय? मुळात खाजगी इंजिनियरांचे उत्तरदायित्व काय? खासकरून अशा कंपनीचे जे सेवा पुरविणाऱ्या कंपनीचे अधिकृत वेंडरचा नाहीय,असे देखील क्विंट आपल्या बातमीत म्हणतेय.

 

क्विंटला दिलेल्या एका मुलाखतीत निवडणूक आयोगाचे माजी निवडणूक आयुक्त ओ.पी.रावत यांनी सांगितले होते की,ईव्हीएमला हॅक करता येत नाही. परंतु व्हीएमला निवडणूक आयोगाच्या देखरेखीतून बाहेर गेले तर काहीही होऊ शकते. त्यामुळे क्विंटच्या आजच्या वृत्ताला महत्वप्राप्त झालेय. दरम्यान, भारतीय लोकशाहीत ईव्हीएमच्या प्रामाणिकतेवर कायमच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. विरोधीपक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्यांसह पत्रकारांनी देखील अनेकवेळा शंका उपस्थित केल्या आहेत.

Protected Content