Home क्राईम गांजाची चोरटी विक्री करणाऱ्या तरूणाला अटक !

गांजाची चोरटी विक्री करणाऱ्या तरूणाला अटक !


चोपडा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा शहरातील वाडी गाव येथून अवैधपणे ओला गांजाची विक्री करणाऱ्या तरूणावर अडावद पोलीसांनी कारवाई केली असून त्याच्याकडून १ लाख ४ हजार रूपये किंमतीचा ओला गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील वाडी गावातून एक तरूण हा अवैधपणे गुंगीकारक गांजाची चोरटी विक्री करत असल्याची गोपनिय माहिती अडावद पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी शनिवारी २८ जून रोजी सायंकाळी ७ वाजता कारवाई करत संशयित आरोपी सुनिल उर्फ तिसमाऱ्या जगन बारेला वय १९ रा. वाडी ता. चोपडा याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १ लाख ४ हजार रूपये किंमतीचा ५ किलो गांजा जप्त केला. याप्रकरणी पोहेकॉ संजय धनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी सुनिल उर्फ तिसमाऱ्या जगन बारेला याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात हे करीत आहे.


Protected Content

Play sound