Home आरोग्य योगप्रेमींचा मेळावा : महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या वतीने सामूहिक योगाभ्यास !

योगप्रेमींचा मेळावा : महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या वतीने सामूहिक योगाभ्यास !

0
231


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून, महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख, योग शिक्षक सुनील गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली आज जळगावातील सिद्धार्थ लॉन येथे विशेष योग सत्राचे आयोजन करण्यात आले. ‘ओम योगा ग्रुप’ आणि ‘महाराष्ट्र योग शिक्षक संघ जळगाव’चे सर्व योगशिक्षक व योगप्रेमी या सत्रात एकत्रित सहभागी झाले होते.

यावेळी सुनील गुरव सरांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाची माहिती देऊन, योगासने आणि प्राणायामाच्या माध्यमातून निरोगी, सुखी, समाधानी व आनंदी जीवन कसे जगता येते, हे सोप्या भाषेत समजावून सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थितांना योगाचे महत्त्व आणि त्याचे दैनंदिन जीवनातील फायदे अधिक चांगल्या प्रकारे समजले.

या कार्यक्रमाला महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्षा चित्रा महाजन, उपाध्यक्षा डॉ. शरयू विसपुते, महासचिव पांडुरंग सोनार, कोषाध्यक्षा नूतन जोशी, सचिव अर्चना गुरव, मीडिया प्रभारी रोहन चौधरी, योगशिक्षक राकेश शिरसाठे, रश्मी शिरसाठे आणि ‘ओम योगा ग्रुप’चे सर्व सदस्य उपस्थित होते. सुमारे ५० ते ७५ योगप्रेमींनी या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला. अत्यंत उत्साहात आणि यशस्वीपणे हा कार्यक्रम पार पडला. सत्राच्या शेवटी सहभागी योगप्रेमींसाठी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती.


Protected Content

Play sound