Home Cities अमळनेर युवा पिढीने महाराणा प्रताप यांच्या जीवनातून प्रेरणा घ्यावी !- पालकमंत्री गुलाबराव पाटील

युवा पिढीने महाराणा प्रताप यांच्या जीवनातून प्रेरणा घ्यावी !- पालकमंत्री गुलाबराव पाटील


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराणा प्रताप हे केवळ राजे नव्हते, तर स्वराज्यासाठी लढणारे एक असामान्य योद्धा होते. त्याग, स्वाभिमान आणि मातृभूमीप्रेम ही त्यांची खरी ओळख असून, आजच्या युवा पिढीने त्यांच्या संघर्षमय जीवनातून प्रेरणा घ्यावी, असे प्रतिपादन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. अमळनेर येथे महाराणा प्रताप जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

या कार्यक्रमाला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, आ.अनिल पाटील, माजी आ. साहेबराव पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन केले.

यावेळी बोलताना सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले की, महाराणा प्रताप यांनी आपल्या स्वाभिमानासाठी कधीही तडजोड केली नाही, हे त्यांच्या संघर्षमय जीवनातून स्पष्ट दिसून येते. आमदार अनिल पाटील यांनी जिद्द, निष्ठा आणि देशप्रेम या गुणांचे महत्त्व आजच्या तरुणांनी आत्मसात करावे, असे आवाहन केले. या कार्यक्रमास विविध पदाधिकारी, विद्यार्थी, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराणा प्रताप यांच्या शौर्याला आणि त्यागाला आदरांजली वाहण्यासाठी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.


Protected Content

Play sound