जळगाव प्रतिनिधी। जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनेत विंचूदंश झालेल्या चौघांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की, राखी खुशाल पाटील (वय 29, रा. कुसुंबा जळगाव), बुटासिंग बटाटा (वय 20, रा.गरवेपाडा, चोपडा), बंटी गणेश चव्हाण (वय 14, रा. वसंतवाडी जि. जळगाव), मिराबाई मनोहर चौधरी (वय 40, रा. काशिनाथ नगर, जळगाव) या चौघांना वेगवेगळ्या घटनेत विंचूने दंश केला आहे. या चौघांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. चौघांची प्रकृती धोक्या बाहेर असल्याचे कळते.