नेत्रहीन लोकांसाठी लवकरच येणार नवीन ॲप

paise

 

नवी दिल्ली प्रतिनिधी । भारतीय रिझर्व्ह बँक लवकरच एक मोबाईल ॲप घेऊन येत आहे. ह्या ॲपमुळे नेत्रहीन लोकांना चलन ओळखण्यास मदत होणार आहे.

याबाबत माहिती अशी की, हे अ‍ॅप नेमके कसे काम करील? याबाबत माहिती देताना सूत्रांनी सांगितले की, नगदी स्वरुपात पैश्यांची देवाण-घेवाण अधिक प्रमाणात होते. त्यामुळे नोटांची ओळख निश्चित करण्यासाठी कॅमेऱ्यासमोर नोट ठेवून तिचा फोटो घ्यावा लागेल. जर नोटाचा फोटो योग्य पद्धतीने आला, तर हे अ‍ॅप ऑडिओ नोटिफिकेशनच्या माध्यमातून अंध व्यक्तीला नोटाचे मूल्य सांगेन. जर, नोटाचा फोटो योग्य पद्धतीने आला नाही तर हे अ‍ॅप पुन्हा प्रयत्न करण्यास सांगेल. तसेच आरबीआयने सांगितल्याप्रमाणे, नेत्रहीन लोकांसाठी नगदी आधारित देवाण-घेवाण यशस्वी बनविण्यासाठी नोटांची ओळख होणे आवश्यक आहे. नोटांची ओळख होण्यासाठी नेत्रहीन लोकांसाठी ‘इंटाग्लियो प्रिंटिंग’ आधारित ओळख चिन्ह देण्यात आले आहे. मोबाईल अ‍ॅप विकसित करण्यासाठी बँक विक्रेत्याचा शोध घेत आहे. हे अ‍ॅप महात्मा गांधींजींच्या छायाचित्रांच्या जुन्या आणि नवीन सिरीजच्या नोटा ओळखण्यात सक्षम असेल. देशभरात ८० लाख नेत्रहीन लोक आहेत. आरबीआयच्या या निर्णयाने नेत्रहीन लोकांना नोटा ओळखण्यास मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

Protected Content