Home मनोरंजन अभिनेते राजीव कपूर यांचे निधन

अभिनेते राजीव कपूर यांचे निधन

0
34

 

मुंबई : वृत्तसंस्था । दिवंगत अभिनेता ऋषी कपूर यांचा धाकटा भाऊ आणि अभिनेते राजीव कपूर यांचं निधन झालं आहे. ते ५८ वर्षांचे होते. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली .

 

अभिनेत्री नीतू कपूर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली .

 

“मी माझा धाकटा भाऊ आज गमावला आहे. आता तो या जगात नाही. डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र, त्याचे प्राण वाचवता आले नाहीत. मी आता रुग्णालयात आहे आणि त्याचं शव मिळण्याची वाट पाहतोय”, अशी पोस्ट रणधीर कपूर यांनी केली आहे. रणधीर यांच्याप्रमाणेच नीतू कपूर यांनीदेखील राजीव कपूर यांचा फोटो शेअर करत या वृत्ताला दुजोरा दिला

 

 

राजीव कपूर यांनी राज कपूर दिग्दर्शित  ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटाच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्यांनी ‘प्रेम ग्रंथ’ या चित्रपटाचं दिग्दर्शनदेखील केलं होतं.


Protected Content

Play sound