Home Cities अमळनेर अमळनेर तालुक्यात मरीआईची यात्रा

अमळनेर तालुक्यात मरीआईची यात्रा


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथून जवळच असलेल्या पाडळसरे येथे आज सालाबादप्रमाणे यावर्षीही मरिआईचा यात्रोत्सव संपन्न होत आहे. पाडळसरे येथे गेल्या सहा वर्षापासून मरिआईची यात्रा भरावयास प्रारंभ झाला.येथील माजी उपसरपंच भिला साळुंखे ये गावातील ग्रामस्थांच्या मदतीने हि यात्रा भरावयास सुरुवात केली आहे.गेली चार वर्षांपासून पाडळसरे या गावाचे नवीन पुनर्वसन येथे समायोजन झाले आहे.

तापी नदी काठावर वसलेले नाटेश्वर महादेव मंदिर व गावात असलेलं मरीआई मातेचे मंदिर याच जुन्या गावी स्थित असल्यामुळे आजही यात्रा याच ठिकाणी संपन्न होत असते,हे विशेष.गावातील इडा पीडा दूर सारणाऱ्या मरीआईच्या या,यात्रोत्सवात गावातील महिला अबाल वृद्ध स्वयंपूर्तीने सहभागी होत असतात.गावातील व परीसरातील श्रोते यांच्या लोकमनोरंजनासाठी शिवाभाऊ सांगवीकर यांचा लोक नाट्य तमाशा मंडळ यांचा कार्यक्रम होणार आहे. दरम्यान आज होणाऱ्या यात्रोत्सव काळात हॉटेल्स,झुले पाळणे,खेळणी दुकाने,संसारोपयोगी साहित्य दुकानदार यांनी दुकाने थाटावी तसेच यात्रा काळात शांतता राखावी असे आवाहन पाडळसरे ग्रामपंचायत च्या वतीने करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound