चोपडा प्रतिनिधी । येथील माळी वाड्यात राहणा-या कविता वाणी यांनी आपल्या विभागात पर्यावरण कार्याची दखल घेतल्यामुळे त्यांची पर्यावरण मित्र संघटना या संस्थेच्या नियुक्ती समिती अंतर्गत जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
सविस्तर माहिती अशी की, माळी वाड्यात राहणाऱ्या कृषी कन्या कविता वाणी यांची नुकतीच पर्यावरण मित्र संघटनाच्या जिल्हाध्यक्षापदी देवा तांबे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली असून, राष्ट्रीय उपाध्यक्षा वर्षा भांडारकर व राष्ट्रीय सचिव जनार्दन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्या या निवडीबद्दल व पुढील पर्यावरण कार्यास संस्थेच्या वतीने शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात आले आहे.संपूर्ण भारत देशाला हरित करण्यासाठी तसेच प्रदूषण, रोगराई, दुष्काळ, पाणी टंचाई यामुळे होणाऱ्या शेतकरी बांधवांच्या आत्महत्या यातून मुक्त करण्यासाठी निघालेली पर्यावरण मित्रांची वारी म्हणजे पर्यावरण मित्र संघटना (भारत), संस्था आहे.पर्यावरण मित्र संघटना, ही संस्था आळंदी देवाची जगाची आई ज्ञानेश्वर माऊली यांच्या पावन दर्शनाने पर्यावरण संरक्षण कार्यास सुरुवात करून संपूर्ण भारत देशांत पर्यावरण संरक्षणाचा प्रामाणिक संदेश देत आपल्या ध्येय प्राप्तीकडे वाटचाल करत आहे.
त्याचप्रमाणे ही संस्था प्रामाणिक पर्यावरण कार्य करून संपूर्ण भारत देश हरित करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन वाटचाल करीत आहे. हें पर्यावरण कार्य योग्य दिशेने वाटचाल करावे व ध्येय सिद्धी प्राप्त व्हावी. या अनुषंगाने संस्थेचे महाराष्ट्र राज्य तसेच भारतातील विविध राज्य, जिल्हे व तालुके पदावर संस्थांच्या नियुक्ती विभागाच्या अंतर्गत व वरिष्ठ पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली, जबाबदार व पर्यावरण कार्यात विशेष योगदान असलेल्या कुशल पदाधिकारीची इच्छुक विभागात नियुक्ती केली जात आहे. या निवडीबद्दल कृषिकन्या कविता वाणी यांचे माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, चन्द्रहासभाई गुजराथी यांचासह अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.