रक्तदान करून माणुसकी धर्म सार्थकी लावावा ; पोलिस निरीक्षक खताळ 

 

पाचोरा, प्रतिनिधी । रक्ताची किंमत त्या नातेवाईकांना विचारा ते एका रक्ताच्या बॅगसाठी रक्तपेढीमध्ये चकरा मारतात, आपण प्रत्येकाने आज रक्तदान करून उद्याची आपली गरज पूर्ण करू या  असे आवाहन पोलीस निरीक्षक राहूल खताळ यांनी केले.

ते लोहारा येथे सुलक्ष्मी सेवाभावी संस्था व  माणुसकी ग्रुपतर्फे समाजसेवक गजानन क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित रक्तदान शिबिरात बोलत होते. याप्रसंगी उपनिरीक्षक संदीप दिवटे, ह.भ.प. ईश्वर महाराज पाळधीकर , समाजसेविका वंदना चौधरी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. जितेंद्र वानखेडे, आरोग्यसेवक कमलाकर पाटील, जे.बी.एन. महाराष्ट्र न्यूज कार्यकारी संपादक ईश्वर चोरडिया, सामाजिक कार्यकर्ते मुक्ताराम गव्हाणे , पत्रकार बांधव, उपस्थित होते.

पोलीस निरीक्षक राहूल खताळ पुढे म्हणाले की, डोके फोडून रक्ताचे पाट वाहन्या ऐवजी रक्तदान करून एकमेकांचे जीव वाचवावा, मला पण रक्तदान करायचे होते व ती माझी इच्छा पूर्ण झाली. सामाजिक कार्यासाठी सर्वांनी पुढे यावे. समाजसेवक गजानन क्षीरसागर यांनी अशीच समाजसेवा करावी व त्यांच्या पुढील कार्यास आमच्या शुभेच्छा, आम्ही पुढे पण त्यांच्या सामाजिक कार्यात सहभागी राहु.

कार्यक्रमाचे आकर्षण जुनिअर चार्ली चापलीन सोमनाथ स्वभावाने, “केसावर फुगे” फेम खानदेशी अभिनेता व गायक अण्णाभाऊ सुरवाडे, समाजसेवक सुमित पंडित उपस्थित होते. कोविडच्या प्रादुर्भावामुळे रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात ४२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. सूत्रसंचालन देविदास साबळे व समाजसेवक सुमित पंडित यांनी केले व आभार गजानन क्षीरसागर यांनी मानले. यशस्वीतेसाठी कमलाकर महाजन, अक्षय देशमुख, चंद्रकांत गीते, विकास माळी, गोपाल वाणी, प्रकाश मोतीहार, मनोज वाणी, देविदास पंडित, योगेश वाणी, सिताराम वाणी, विश्वास बाविस्कर, अमोल कायटे, अमोल पाटील, बापू पाटील, वसंत गिते, मंगला गीते, चंद्रभागा वाणी, रूपाली क्षीरसागर, विजया वाणी, कविता वाणी, लक्ष्मी पंडित, मीरा पंडित आदी माणुसकी ग्रुप सदस्य व लोहारा परिसरातील नागरिक यांनी सहकार्य केले. रक्त संकलनाचे कार्य माधवराव गोळवलकर स्वयंसेवी संस्था जळगाव यांनी केले.

Protected Content