Home Cities चोपडा अखिल भारतीय युवा गुर्जर महासभेतर्फे मोफत औषधी वाटप

अखिल भारतीय युवा गुर्जर महासभेतर्फे मोफत औषधी वाटप

58a9f8ce e722 4aa2 b0d3 1fdea65d0bb1
58a9f8ce e722 4aa2 b0d3 1fdea65d0bb1

58a9f8ce e722 4aa2 b0d3 1fdea65d0bb1
 

चोपडा (प्रतिनिधी) निमगव्हाण येथून गुरूपौर्णिमे निमीत्त श्री दादाजी दरबारचे भक्तगण दरवर्षी  खंडव्याला पायी जात असतात. वारीत पायी जाणाऱ्या भक्तांना येथील अखिल भारतीय युवा गुर्जर महासभेतर्फे कारगिल चौकात मोफत औषधी वाटपाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.

 

श्री दादाजी दरबार निमगव्हाण येथून खंडवासाठी गुरूपौर्णिमे निमीत्त पायी वारी रवाना झाली. त्यावेळी भक्तजणांची मोठी गर्दी होती. दरवर्षाप्रमाणे या वर्षी महीलांची संख्या जास्त होती. कारगील चौकात दादाजीच्या भक्तांना नाश्ता ,चहापाणी देण्यात आले. त्यानंतर दिंडी तेथून पुढे रवाना झाली. यावेळी अखिल भारतीय युवा गुर्जर महासभेतर्फे मोफत औषधी वाटप करण्यात आली. यावेळी अखिल भारतीय युवा गुर्जर महासभेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. दिग्विजय पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष नवलसिंग राजे, जिलाध्यक्ष श्रीराम पाटील,सचिन पाटील,प्रदेश मिडीया प्रभारी प्रमोद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रीतम पाटील, जिल्हा सचिव अनिकेत पाटील, जिल्हा सरचिटणीस गौरव पाटील, मिडीया प्रभारी शुभम पाटील, जळगाव शहर अध्यक्ष महेंद्र पाटील व सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound