एमआयडीसी पोलीस निरीक्षकपदी संदीप पाटील यांची नियुक्ती !

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांची उचलबांगडी करून नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली होती. त्यांच्या जागी जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्ती केली आहे. तसे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काढले आहे.

जळगाव शहरातील इच्छादेवी मंदीर चौकात घरगुती गॅस वाहनात भरत असतांना भीषण स्फोट होवून ७ जणांचा मृत्यू झाला आहे. ४ जण जखमी झाल्याची घटना गेल्या महिन्यात घडली होती. त्यावेळी निवडणूक असल्यामुळे कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. अगदी इच्छादेवी पोलीस चौकीपासून १०० फुट अंतराव अवैधपणे घरगुती गॅसचा काळाबाजार करून वाहनामध्ये भरत असल्याचे माहिती असून देखील त्यावेळी एमआयडीसी पोलीसांनी कोणतीही कारवाई केली नाही. वेळेत ही कारवाई केली असती ही दुर्घटना घडली नसती. त्यावेळी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक असलेले दत्तात्रय निकम यांच्यावर टिका होत होती. शनिवारी ७ डिसेंबर रोजी रात्री उशीरा दत्तात्रय निकम यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी १० डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता रिक्त जागी जिल्हा विशेष शाखेचे संदीप पाटील यांची एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी बदली केली आहे. तसे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी यांनी काढले आहे. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी दुपारीच एमआयडीसी पोलीस ठाण्याचा पदभार स्विकारला आहे.

Protected Content