मेडीकल दुकानाला धमकी देवून जबरी रोकड लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मारण्याची धमकी देत मेडीकल दुकानातून ९ हजारांची रोकड आणि मेडीकलची बिले असा मुद्देमाल जबरी हिसकावून चोरून नेल्याचा प्रकार शिरसोली नाक्यावरील पारख संकूलात घडली आहे. याप्रकरणी शनिवारी ३ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शिरसोली नाक्याजवळील पारख संकुलात श्रावण नामदेव भोई (वय-३५) रा. नित्यानंद नगर, जळगाव यांचे भाईराज नावाचे मेडीकल दुकान आहे. शनिवारी ३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास श्रावण भोई हे मेडीकल दुकानावर असतांना भोलासिंग जगदीशसिंग बावरी (वय-२६) रा. तांबापूरा जि.जळगाव हा तिथे आला. त्याने काहीही कारण नसतांना दुकानदार श्रावण भोई याला मारहाण केली. त्याच्या दुकानातील गल्ल्यातून ९ हजाराची रोकड आणि मेडीकल बिलांची कागदपत्रे घेवून जबरी चोरी केल्याची घटना घडली. यासंदर्भात श्रावण भोई यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी भोलासिंग जगदीशसिंग बावरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शांताराम पाटील करीत आहे.

Protected Content