एरंडोल विधानसभा मतदारसंघात होणार बहुरंगी लढत !

एरंडोल-रतीलाल देसले-पाटील | यंदाच्या एरंडोल-पारोळा विधानसभा निवडणुकीत बहुरंगी लढत रंगणार असून यात नेमकी कोण बाजी मारणार याबाबत मतदारसंघात चर्चेला उधाण आले आहे.

महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुका होणार असून आचारसंहिता लागली आहे. परिणामी इच्छुक उमेदवारांची मतदार संघात मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. आपल्याला तिकीट मिळावे यासाठी उमेदवारांच्या हालचालींना वेग आला असल्याचे चित्र मतदार संघात आहे. विधानसभेच्या रिंगणात कोणकोणते उमेदवार येतील याबद्दल मतदारसंघात देखील चर्चा रंगू लागल्या आहेत.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत प्रत्येक पक्षातून दोन ते तीन इच्छुक उमेदवारांची संख्या आहे म्हणून निवडणुकीत चित्र वेगळे होण्याचे चिन्ह सध्या मतदारसंघात दिसून येत आहे प्रत््येक पक्षात आपसात संघर्ष होणार हे सुद्धा नागरिकांकडून बोलले जात आहे. परंत्ुा आपली बाजू सरस करून पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून तिकीट मिळवण्यास कोण कोण यशस्वी होईल हे अजून गुलदस्त्यात आहे.

एरंडोल विधानसभा मतदारसंघ पारोळा व एरंडोल तालुका तसेच भडगाव मधील काही भाग एरंडोल विधानसभा मतदारसंघात येतो. या निवडणुकीत दोन राष्ट्रीय पक्षात फूट पडली असल्यामुळे इच्छुकांची संख्या जास्त होणार आहे. यात विद्यमान आमदार चिमणराव पाटील यांचे सुपुत्र अमोल पाटील हे शिंदे गटाकडून इच्छुक आहेत. या दृष्टीने त्यांची तयारी देखील सुरू झालेली आहे.
ताज्या वृत्तानुसार अमोल चिमणराव पाटील यांची उमेदवारी निश्चीत झाली असून त्यांच्या नावाच्या घोषणेची फक्त औपचारिकता उरली आहे. तर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे खंदे समर्थक भगवान महाजन हे देखील उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. तर शक्यतो ते अपक्ष म्हणून देखील रिंगणात उतरू शकतात. त्यांची याच पध्दतीत तयारी सुरू आहे.

या निवडणुकीत माजी मंत्री डॉ. सतीश पाटील हे शरद पवार गटाच्या माध्यमात्ूान रिंगणात उ तरतील अशी शक्यता आहे. तथापि, उध्दव ठाकरे गटाने देखील या जागेवर दावा केला असून यात करण पवार, डॉ. हर्षल माने, नाना महाजन, दशरथ महाजन यांनी देखील आपली दावेदारी दाखल केल्याचे समजते. अर्थात, आता वरिष्ठ पातळीवरून नेमकी जागा कुणाला सुटणार यावर बरेचसे गणीत अवलंबून राहणार आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गट देखील मागे नसून माजी आमदार डिगंबर शंकर यांचे नातू अमित पाटील व पारोळा येथील समाज सेवक तसेच अनिल पाटील यांचे समर्थक डॉ संभाजी राजे पाटील हे निवडणूकीची तयारी करतांना दिसून येत आहेत. तर भाजप कडून माजी खासदार ए.टी. पाटील,गोविंद शिरोळे, माजी आमदार महेंद्रसिंग पाटील यांचे पुत्र ॲड.रघुवीरसिंग पाटील व पुतणे नरेंद्र पाटील, एरंडोलचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेश परदेशी हे देखील या शर्यतीत आहेत. प्रत्येक पक्षाला पक्षाचे तिकीट देण्यासाठी डोकेदुखी वाढणार आहे. यामुळे मतदारसंघात काही नाराज उमेदवार बंडखोरी करतील असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. दरम्यान पक्षाचे तिकीट मिळवून किंवा अपक्ष निवडून विधान भवनात जाण्यासाठी कोण मजल माँरेल या कडे मतदार संघाचे लक्ष आहे जाणकारांच्या यंदा मोठी चुरस असून यामुळे मतदारांना लक्ष्मीदर्शन घडण्याची शक्यता आहे.

दरम्यान एरंडोल मतदारसंघ फेर बदल झाल्या अगोदर स्थानिक उमेदवार असणारे माजी आमदार डिगंबर दादा पाटील,पारू ताई वाघ,महेंद्रसिंग पाटील,हरिभाऊ महाजन तसेच विद्यमान मंत्री गुलाबराव पाटील यांनी मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले होते.पण मतदार संघात फेर बदल झाल्यानंतर २०१४ सालच्याा निवडणुकीत स्थानिक उमेदवार असणारे भाजपचे मच्छिंद्र पाटील व मनसे कडून नरेंद्र पाटील यांनी चांगले प्रयत केले पण त्यांना यश गाठता आले नाही. या उमेदवारांनी एरंडोल तालुक्यातुन चांगले मते मिळाली पण पारोळा तालुक्यातून पाहिजे तेवढे मताधिक्य मिळवता आले नाही. तथापि, याउलट पारोळा तालुक्यातून उमेदवारी करणारे जे उमेदवार एरंडोल तालुक्यातून जास्तीचे मते आपल्याकडे आकर्षित करतात ते यशस्वी होतात हे आजवर दिसून आले आहे. यंदा देखील हा ट्रेंड कायम राहणार का ? याचे उत्तर हा येणारा काळच ठरविणार आहे.

Protected Content