भाजपचे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे प्रेम बेगडी : भाई जगताप

मुंबई (वृत्तसंस्था) छत्रपती शिवाजी महाराज आणि आई भवानीचे नाव घेतलेले तुम्हाला चालणार नाही? तुमचं शिवाजी महाराजांबद्दलचं प्रेम बेगडी आहे, हे आम्हाला माहिती आहे, असे ट्वीट करत काँग्रेस नेते भाई जगताप यांनी व्यंकय्या नायडू यांचा जाहीर निषेध केला आहे.

 

भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी बुधवारी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणा दिली. मात्र, राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी त्यावर आक्षेप घेत उदयनराजे भोसले यांना समज दिली. यावर भाजपला शिवाजी महाराज केवळ निवडणुकांपुरते हवे असतात, अशी टीका काँग्रेस नेते भाई जगताप यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि आई भवानीचे नाव घेतलेले तुम्हाला चालणार नाही? तुमचे शिवाजी महाराजांबद्दलचे प्रेम बेगडी आहे, हे आम्हाला माहिती आहे. शिवाजी महाराज तुम्हाला केवळ निवडणुकांपुरतेच हवे असतात. व्यंकय्या नायडू यांचा जाहीर निषेध, असे भाई जगताप यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Protected Content