यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल शहरात संभाव्य पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता असताना, आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या तत्पर हस्तक्षेपामुळे हातनूर धरणातून पाण्याचे आवर्तन सुरू करण्यात आले आहे. या निर्णयामुळे शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून पाणीटंचाईची चिंता काही प्रमाणात दूर झाली आहे.
यंदा पावसाने उशीर केल्यामुळे यावल शहरासह नगरपरिषद क्षेत्रात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही बाब लक्षात घेऊन यावल नगरपालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या गटनेत्या सौ. नंदा महाजन यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने आमदार अमोल जावळे यांची भेट घेतली. या भेटीत हातनूर धरणातून पाण्याचे आवर्तन पुढेही सुरू ठेवण्याची मागणी करण्यात आली. नागरिकांच्या हिताचा विचार करून आमदार अमोल जावळे यांनी तातडीने या विषयाची दखल घेतली आणि हातनूर धरणातील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक चर्चा केली. त्यांच्या प्रयत्नांना यश येत आजपासून धरणातून पाण्याचे आवर्तन सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

या बैठकीत नगरपालिकेच्या भाजप गटनेत्या सौ. नंदा महाजन यांच्यासह नगरसेविका सौ. सविता विजय नन्नवरे, नगरसेवक उमेश फेगडे, बाळू फेगडे, योगेश चौधरी तसेच भाजप तालुका अध्यक्ष सागर कोळी, माजी प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते, भाजपा वैद्यकीय आघाडीचे डॉ. कुंदन फेगडे, वढोदा सरपंच संदीप सोनवणे, डॉ. निलेश गडे, दिलीप वाणी, व्यंकटेश बारी, भूषण फेगडे, बबलू घारू यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.



