मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा रुग्णालयाला १६ वॉटर फिल्टर यंत्र भेट

जळगाव प्रतिनिधी । मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यावतीने १६ वार्डात गरम व थंड पाण्याचे वॉटर फिल्टर यंत्र भेट देण्यात आले. तर श्रमिक, कष्टकरी मापारी बांधवांसाठी आरोग्य तपासणी शिबीर जळगाव महानगर शिवसेनेच्या वतीने आयोजीत करण्यात आले होते.

याप्रसंगी बोलतांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कष्टकरी बांधवांनो, महाविकास आघाडी सरकार व शिवसेना कष्टकऱ्यांच्या सन्मानासाठी सदैव कटिबध्द राहणार असुन तुमच्या परिश्रमामुळेच व्यापार, उद्योगात भरभराट येऊन या संकटानंतर महाराष्ट्र समृध्द व देशातील अव्वल क्रमांकाचे राज्य बनेल, असा विश्वास व्यक्त केला.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रेल्वे माल धक्क्यावर ६०० हमाल बांधवांची शिवसेना जळगांव महानगरतर्फे पल्स ऑक्सिमीटर व इन्फ्रारेड थर्मोमीटरने आरोग्यतपासणी व हमाल बांधवांना फेस मास्क, आर्सेनिक अल्बम ३०, मसाला शेंगदाणा व पार्ले-जी बिस्कीट देण्यात आले. यासाठी मनपाच्या आरोग्य विभागाच्या ७ डॉक्टरांच्या टीमने आरोग्य तपासणी केली असून कोविड बाबतीतही मार्गदर्शन केले.

यांची होती उपस्थिती
यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबरावजी वाघ, महानगरप्रमुख शरद तायडे, शिवसेना संघटक दिनेश जगताप, रेल्वे पोलिसचे निरीक्षक, माजी महापौर विष्णू भंगाळे, हमाल माथाडीचे मुकेश बाविस्कर, मानसिंग सोनवणे, नागरसेवक अमर जैन, मनोज चौधरी, युवाशक्तीचे संस्थापक विराज कावडीया, संदेश भोईटे, नितीन सपके, शिवसेना महिला मोर्च्याच्या शोभा चौधरी, ज्योती शिवदे, मनीषा पाटील, चित्रा मालपाणी, शिवसैनिक गणेश गायकवाड, प्रशांत सुरळकर, पूनम राजपूत, बाबू शेख, बाळा कंखरे, उमाकांत जाधव, अर्जुन भारुळे, पियुष तिवारी, प्रीतम शिंदे, इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.

Protected Content