पारोळा -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | दिन दयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत भागीरथी महिला शहर स्तर संघ संचालित सोनचिरैया उपजीविका केंद्राचे उदघाटन आमदार चिमणआबा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती यामिनी लक्ष्मणसा जटे प्रशासकीय अधिकारी नगर परिषद,मार्गदर्शक किशोर अशोकराव चव्हाण मुख्याधिकारी तथा प्रशासक नगरपरिषद पारोळा, समन्वयक चंद्रकांत सोमा माळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी नगरपरिषद, तसेच सामाजिक कार्यकर्त्या सौ किरण चंद्रकांत पाटील याचबरोबर सौ पुष्पा विजय भोकरे सौ नूतन आनंद पाटील महिला शहर उपजीविका केंद्राचे अध्यक्ष सौ मनीषा भरत चौधरी उपाध्यक्ष सौ अर्चना चंद्रकांत पाटील, सचिव सौ पुनम गणेश पाटील, श्रीमती वर्षा सुरेश पवार, सीआरपी योगिता संतोष चौधरी, सुनीता भरत चौधरी, वैशाली बापू चौधरी, विजया जितेंद्र चौधरी आदींची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला बचत गटातील पदाधिकारी तसेच सदस्य या प्रसंगी उपस्थित होते. सोन चिरैया उपजीविका केंद्र मार्फत बचत गटाने उत्पादित केलेला माल सेवा तसेच वस्तू यांची मोठ्या प्रमाणात विक्री होणार असून याला शहरातील नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा तसेच शहरी अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात भर टाकावी असे आमदार चिमणराव पाटील यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले याप्रसंगी मार्गदर्शन करताना किशोर चव्हाण मुख्याधिकारी तथा प्रशासक यांनी नोबल पुरस्कार विजेते डॉक्टर मोहम्मद युनूस यांनी बांगलादेशात घडवलेल्या अर्थक्रांती बद्दल विशेष मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच प्रास्ताविक चंद्रकांत सोमा माळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी नगरपरिषद पारोळा यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहुल प्रजापती क्षेत्रीय समन्वयक शुभम दिनेश कंखरे व शहर समन्वयक मसूद अहमद शेख मुख्तार यांनी विशेष प्रयत्न केले.