जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जैन इरगेशन सिस्टीम्स लि. च्या स्पोर्ट्स विभागातील प्रशिक्षक मुशताक अली हे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित पंच परीक्षेत यशस्वी होऊन महाराष्ट्राच्या अधिकृत पंचांच्या यादीत त्यांनी स्थान पटकावले आहे.
क्रिकेट खेळाडू ते क्रिकेट प्रशिक्षक व आता क्रिकेटचे अधिकृत पंच हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. मुशताक अली हे आता जिल्ह्यातील चौथे अधिकृत पंच ठरले आहेत. त्यांच्या या यशस्वी कामगिरी बद्दल जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक व जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिशनचे अध्यक्ष अतुल जैन, सचिव अरविंद देशपांडे सहसचिव अविनाश लाठी, जळगावचे महाराष्ट्र क्रिकेट असोसिशनच्या पंच समितीचे सदस्य संदीप गांगुर्डे यांच्यासह जैन स्पोर्टस् अॅकडमीच्या सर्व सहकाऱ्यांनी त्यांचे कौतूक केले आहे.