Home Cities जळगाव विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी नियमित बससेवा सुरू करा; मनसेचे निवेदन

विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी नियमित बससेवा सुरू करा; मनसेचे निवेदन

0
24

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव आगारातून कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी नियमित बससेवा सुरू करावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जळगाव आगाराचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांना निवेदन देण्यात आले.

जळगाव शहरातील विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी दररोज कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ गाठणे हा मोठा संघर्ष आहे. सध्या उपलब्ध असलेल्या वाहनसेवा मर्यादित आहेत आणि यामुळे विद्यार्थ्यांना वेळेवर विद्यापीठात जाणे अवघड होते. हे दृश्य केवळ त्यांच्या प्रवासाच्या असुविधेकडेच लक्ष वेधत नाही, तर त्यांच्या उज्ज्वल भविष्यावरही याचा नकारात्मक परिणाम होत आहे. विद्यापीठासाठी नियमित एस.टी. बस सेवा सुरू केल्यास, विद्यार्थ्यांसाठी सोयीचे होईल. याचसोबत, विद्यार्थ्यांसाठी सवलतीचे तिकीट दर लागू केल्यास, शिक्षणाचा लाभ सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांना मिळू शकेल, या संदर्भात निर्णय घेऊन बस सेवा सुरू करावी अशी तातडीची मागणी मनसे ने केली आहे.

या प्रसंगी मनसे चे जिल्हाध्यक्ष अॅड. जमील देशपांडे महानगराध्यक्ष किरण तळेले, उपमहानगराध्यक्ष सतिष सैंदाणे, ललित शर्मा, रज्जाक सय्यद, चेतन पवार, जितेंद्र पाटील, अमोल पाटील, अविनाश पाटील, साजन पाटील, संदीप मांडोळे, ऐश्वर्य श्रीरामे, शिवाजी पाटील, दर्शन पाटील, सुरज कुमावत, संकेत पगारे, आकाश ठाकूर उपस्थित होते.


Protected Content

Play sound