भारतात मंकीपॉक्सच्या क्लॅड -१ स्ट्रेनचा पहिला रुग्ण आढळला

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | जागतिक स्तरावर अतिशय धोकादायक म्हणून घोषित करण्यात आलेल्या मंकीपॉक्सच्या क्लॅड १ स्ट्रेनचा पहिला रुग्ण भारतात सापडला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं अतिधोकादायक स्ट्रेन म्हणून घोषित केलेल्या मंकीपॉक्सचा रग्ण केरळच्या मलप्पुरम इथं आढळला आहे. या रुग्णाचं वय ३८ वर्षे आहे. बाधित व्यक्ति हा काही दिवसांपूर्वी संयुक्त अरब अमिराती इथून परतला होता. हा व्यक्ति घातक विषाणूजन्य संसर्गाने बाधित असला तरी त्याची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

प्राणघातक मंकीपॉक्स क्लेड १ बी स्ट्रेनचा पहिला रुग्ण आता भारतात आढळला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) गेल्या महिन्यात सार्वजनिक या विषाणू बाबत आणीबाणी घोषित केली होती. मंकीपॉक्स क्लेड १ बी विषाणूने बाधित हा रुग्ण केरळमध्ये आढळून आला आहे. हा व्यक्ति संयुक्त अरब अमिराती (UAE) मधून नुकताच परतला असून तो मलप्पुरम येथे राहतो. या विषाणूने बाधित हा पहिलाच रुग्ण आहे. या विषाणूने बाधित रुग्ण आढळल्याने जागतिक आरोग्य संघटनेने गेल्या महिन्यात दुसऱ्यांदा मंकीपॉक्सला सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. यापूर्वी, दिल्लीत मंकीपॉक्सने बाधित रुग्ण आढळला होता. हिसार, हरियाणातील एका २६ वर्षीय तरुणाला पश्चिम आफ्रिकन ‘क्लेड २’ प्रकाराच्या विषाणूची लागण झाली होती.

जागतिक आरोग्य संघटनेने २०२२पासून मंकीपॉक्सला ‘आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य आणीबाणी’ घोषित केले आहे. तेव्हापासून भारतात ३० रुग्ण बाधित आढळले आहेत. दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला दिल्लीच्या लोकनायक जयप्रकाश नारायण (एलएनजेपी) रुग्णालयात दाखल असलेल्या बाधित रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

हरियाणाच्या हिसार येथील रहिवासी असलेल्या २६ वर्षीय रुग्णाला सुमारे १२ दिवस एमपॉक्सच्या रुग्णांसाठी तयार करण्यात आलेल्या हॉस्पिटलच्या आपत्कालीन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. रुग्णाला ८ सप्टेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि डॉक्टरांनी ९ सप्टेंबर रोजी या त्याला मंकीपॉक्स झाल्याचे उघड झाले. या रुग्णावर उपचार करून २१ सप्टेंबर रोजी त्याला डिस्चार्ज देण्यात आला.

या रूग्णालयात २० आयसोलेशन वॉर्ड आहेत. त्यापैकी १० एमपीक्सच्या संशयित रुग्णांसाठी वेगळे ठेवण्यात आले आहेत. तर उर्वरित एमपॉक्सची पुष्टी झालेल्या काही रूग्णांसाठी आहेत. गुरु तेग बहादूर हॉस्पिटल आणि बाबा साहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये, MPox च्या संशयित रूग्णांसाठी आणि ज्यांना या आजाराची लागण झाल्याचे उघड झाले आहे, अशा रुग्णांसाठी प्रत्येकी पाच खोल्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

 

Protected Content