जम्मू-कश्मीरचे माजी राज्यपाल महाविकास आघाडीचा प्रचार करणार

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी रविवारी उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांचा सविस्तर चर्चा झाली.

भेटीनंतर बोलताना सत्यपाल मलिक यांनी म्हटले की, ”महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुका देशाच्या राजकारणावर लक्षणीय परिणाम करतील, भाजपला फक्त मोठा फटका बसणार नाही, तर राज्याच्या निवडणुकीत पक्षाचा सफाया होईल. या निवडणुकीत उद्धव ठाकरे सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतील. तुम्हाला गरज आहे. माझा महाविकास आघाडीला पूर्ण पाठिंबा आहे. मी महाविकास आघाडीसाठी प्रचारही करेन.

राज्यात विधानसभा निवडणूक येत्या नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. राज्यातील सत्ताधारी महायुतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, भाजप आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. तर महाविकास आघाडीत शिवसेना उबाठा, काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस यांचा समावेश आहे.

Protected Content