यावलमधील ५७ गावात ९३ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून उद्या होणार श्रीचे विर्सजन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल शहरात २१ तर ग्रामीण भागात यावल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ५७ गावात ७२ अशा एकुण ९३ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून उद्या मंगळवारच्या दिवसी श्रीची उत्साहात स्थापना करण्यात आली होती. शहरात पाच दिवसाचा तर विविध गावात ६, ९ व ११ दिवसाच्या श्रीगणेशोत्सव विविध आकर्षक रोषणाईने साजरा करण्यात आले. शहरात गुरूवार पासुनचं मोठ्या उत्साहात गणेश मूर्तींचे आगमन करण्यात झाले.

यावल शहरात शनीवारच्या दुपार नंतर गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी भक्तीमय वातावरणात श्रीची स्थापना केली. यावल शहरात १ खाजगी तर २० सार्वजनिक तसेच पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या ग्रामिण भागातील ५७ गावात एकुण ७२ सार्वजनिक गणोशोत्सव मंडळाकडून नोंदणी करण्यात आली आहे. तालुक्यात गणेशोत्सव साजरा करण्याच्या चार पध्दती आहेत. यामध्ये शहरातील गणोशोत्सव पाच दिवसांचा असेल तर काही गावात सहा दिवस, नऊ दिवस व दहा दिवस अशा पध्दतीने गणोशोत्सव साजरा करण्यात येतो. या तालुक्यातील यावल शहरासह साकळी, किनगाव, नायगाव, कोरपावली व दहिगाव ही अति संवेदनाक्षम गावे आहेत.

यंदाच्या गणेशात्सवात फैजपूर उपविभागीय पोलिस अधिकारी अन्नपुर्णा सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाच्या माध्यमातुन निरिक्षक प्रदिप ठाकुर, पोलिस उपनिरिक्षक सोपान गोरे, पोलिस उपनिरिक्षक सुनिल मोरे यांच्या वतीने कायदा सूव्यवस्थेच्या संदर्भात सर्वच गावात शांतता समितीच्या बैठक घेण्यात आल्या आहेत. तसेच पोलीस प्रशासन संवेदनशिल गावात विशेष लक्ष ठेवले जात आहे. तसेच श्री स्थापने निमित्त शहरातील मुख्य रस्त्यावर श्रीच्या मुर्ती, पुजा-पत्री तसेच आरास उभारण्यात आली आहे. उद्या होणाऱ्या श्री च्या विसर्जनासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Protected Content