यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्यातील एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी २०१८ ते २०२४ पर्यंत ची महागाई भत्त्याची थकीत वेतनवाढ मिळावी अशा विविध मागण्यांविषयी मुख्यमंत्री स्तरावर चर्चा होवुन देखील तोडगा निघाला नसल्याने अखेर आज दिनांक ३ सप्टेंबर पासुन एसटीतील कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन सुरू केले आहे.
यावल आगारातील बहुसंख्य कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहे. आगार प्रमुख दिलीप महाजन यांनी आगारातुन सुटणाऱ्या सर्व लांब पल्यांचे शेड्अल बंद केले असुन याचा फटका महामंडळाला बसणार आहे. यावल तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थ्यांची शैक्षणिकदृष्टया व आगारातून गणपती फेऱ्यासाठी सुमारे २५ एसटी बसेस या ठाणे येथे पाठविण्यात येणार आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये याकरीता काही बसेस ग्रामीण भागात सोडण्यात येत असल्याची माहिती आगारप्रमुख दिलीप महाजन यांनी दिली. दरम्यान लांब पल्यांच्या बससेवा बंद झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे .