जे. टी. महाजन कॉलेज ऑफ इंजीनियरिंग महाविद्यालयात “इंडक्शन प्रोग्राम” संपन्न

 

फैजपूर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील जे.टी. महाजन कॉलेज ऑफ इंजीनियरिंग या महाविद्यालयामध्ये प्रथम वर्ष इंजीनियरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी दि. 15 ते 21 नोव्हेंबर या दरम्यान “इंडक्शन प्रोग्राम” आयोजित करण्यात आला होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे यांच्या सूचनेनुसार व कॉलेजच्या परंपरेनुसार हा इंडक्शन प्रोग्राम आयोजित करण्यात आला. या “इंडक्शन प्रोग्राम” मध्ये विविध विषयांवरती नामांकित व्यक्तींनी व्याख्याने देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अशा ग्रुप डिस्कशन, कम्युनिकेशन स्किल्स,ड्रॉइंग अँड स्केचेस, स्पोर्ट्स, म्युझिकल चेअर, मेडिटेशन,ब्रेन स्टॉर्मिंग, ओपन युवर माईंड,ऐसे रायटिंग, म्युझिक अंताक्षरी, क्विज इत्यादी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

देवदत्त गोखले यांनी “फोर्ट कल्चर फॉर सेल्फ डेव्हलपमेंट” या विषयावरती मुलांना मार्गदर्शन केले तसेच रश्मी गोखले यांनी “कम्युनिकेशन स्किल्स”या विषयावरती मुलांना मार्गदर्शन केले. माजी विद्यार्थिनी प्रणाली चौधरी प्रोजेक्ट मॅनेजर , पुणे हिने सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मोटिवेशनल स्पीकर मनीष जैन यांनी “स्पिक टू विन” या विषयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मौलिक माहिती दिली. स्वाती गवई यांनी “हेल्थ अँड हॅपिनेस” या विषयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ‘आर्ट ऑफ लिविंग’ चे मार्गदर्शन केले व प्रा व पु होले यांनी ‘माझी जबाबदारी’ या विषयावर विद्यार्थ्यांना संवाद साधला.

हा इंडक्शन कार्यक्रम एक आठवडाभर आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी संस्थाध्यक्ष शरद महाजन, उपाध्यक्ष उल्हास चौधरी, सचिव विजय झोपे व सर्व संचालक मंडळाचे अमूल्य मार्गदर्शन लाभले तसेच प्राचार्य डॉ. आर.डी.पाटील, उपप्राचार्य डॉ.एन.डी नारखेडे, डीन ऍकेडेमीक डॉ पी एम महाजन, सर्व विभाग प्रमुख,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Protected Content