शेअर बाजारात सेन्सेक्सची १२०० अंकांची वाढ; निफ्टी ३०० अंकांनी वधारला

मुंबई वृत्तसंस्था । विषाणूमुळे कोणाचाही मृत्यू झाला नसल्याचे चीनने जाहीर केल्यानंतर आशियातील भांडवली बाजारातील दलाल स्ट्रीटवर सकारात्मक सुरूवात केली आहे. मुंबई शेअर बाजारात सेन्सेक्स १२०० अंकानी उसळला आहे. तर निफ्टी ३०० अंकानी वधारला आहे.

जगभरात करोना विषाणूची साथ झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेच्या वृद्धीबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान काल अमेरिकेतील शेअर बाजारांमध्ये तेजी होती. अमेरिकेतील निर्देशांक ७ टक्क्यांनी वधारले होते. तर महावीर जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टीमुळे भारतीय बाजार बंद होते. जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांनंतर आज भारतातही गुंतवणूकदारांनी खरेदीला प्राधान्य दिल्याचे शेअर दलालांनी सांगितले. भारतीय भांडवली बाजारात आतापर्यंत १. ३ अब्ज डाॅलर्सची गुंतवणूक झाली आहे. शुक्रवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी १९६१ कोटींचे शेअर विक्री केले.

आजच्या सत्रात इंड्सइंड बँक, गुजरात अल्कली, अॅक्सिस बँक, महिंद्रा अॅंड महिंद्रा, गोदरेज प्राॅपर्टिज, कॅडिला हेल्थकेअर, झायडस, आयपीसीए लॅब, सन फार्मा, ग्लेनमार्क फार्मा, इन्फोसिस एचयूएल, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक आदी शेअर तेजीत आहेत. सध्या निफ्टी ८४४९ अंकांवर ट्रेड करत आहे तर सेन्सेक्स २८८४२ अंकांवर आहे.

Protected Content