अजित पवारांनी अर्थसंकल्पाच्या नावाखाली निव्वळ पोकळ भाषण केले : देवेंद्र फडणवीस

 

मुंबई (वृत्तसंस्था) अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना 1 नवा पैसा सरकारने दिला नाही. शेतकऱ्यांच्या बाधांवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी मदतीची घोषणा केली होती, पण या घोषणांचा विसर सत्ताधारी नेत्यांना पडल्याचे दिसून येत आहे. अजित पवारांनी अर्थसंकल्पाच्या नावाखाली निव्वळ पोकळ भाषण केले त्यातून काहीच मिळालेले नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

 

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ओपनिग, क्लोजिग बॅलेन्स किती असेल? किती तूट राहील? यातील कुठलीही गोष्ट अर्थसंकल्पामध्ये नव्हती. या अर्थसंकल्पामुळे तूट वाढणार आहे. अर्थसंकल्पामध्ये कुठलही संतुलन नाहीय, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. अर्थमंत्र्यांना या सरकारला, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा विसर पडला आहे. कोकणाचे नाव घेतले असले तरी, कोकणाच्या तोंडालाही पान पुसण्यात आली आहेत” असे फडणवीस म्हणाले. तसेच आमच्या काळात कर्जाचा बोजा वाढला म्हणणाऱ्यांनी 2009 ते 2014 काळात कर्ज 63 टक्के वाढलं होतं, आमच्या काळात 60 टक्के वाढले. आम्ही 2 लाख हजार कोटीपेक्षा जास्त पायाभूत प्रकल्प सुरु केले. आम्ही त्यावर खर्च केला, असे स्पष्टीकरण देखील फडणवीसांनी यांनी दिले.

Protected Content