मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर येथील जे. ई. स्कूल अँड ज्यू कॉलेज, एम. सी. व्ही. सी. तंत्र शिक्षण अशा शालेय विभागांची यशस्वीपणे जबाबदारी सांभाळून हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविणारे प्राचार्य आर.पी पाटील हे दि. 31 ऑगस्ट 2024 रोजी 29 वर्षे प्रदीर्घ दिलेल्या सेवेतून सेवानिवृत्त झाले. या सेवानिवृत्ती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष आ.एकनाथ खडसे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य जे. जे पाटील यांनी केले.
या कार्यक्रमात सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या तर्फे सेवा निवृत्ती प्रसंगी प्राचार्य आर.पी.पाटील यांना भेटवस्तू देऊन सपत्नीक सत्कार करण्यात. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन रोहिणी खडसे, सचिव डॉ. सी. एस. चौधरी, उपाध्यक्ष नारायण चौधरी आणि सर्व सन्माननीय संचालक मंडळ तसेच महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जे के पाटील, माध्य. शिक्षक पतपेढी जळगाव अध्यक्ष एस .डी भिरुड व संचालक यासह तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक,मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाखांचे प्रमुख, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सेवापूर्ती कार्यक्रमात वाय एस पाटील, बी आर पाटील, तु. ल. कोळंबे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक जोगी यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात आ. एकनाथ खडसेंनी सरांच्या कार्याचे आणि प्रशासनाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सी. डी. पाटील आणि सौ. आर व्हि महाजन यांनी केले.