Home प्रशासन तहसील राज्यातील शाळांमधील सुरक्षेसंदर्भात उबाठा युवा सेनेचे तहसीलदारांना निवदेन

राज्यातील शाळांमधील सुरक्षेसंदर्भात उबाठा युवा सेनेचे तहसीलदारांना निवदेन


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सध्याच्या काळात संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एका मागे एक अशा महिलांवरील व अल्पवयीन शाळेकरी विद्यार्थीनींवर विनयभंग व अत्याचाराच्या घटना मोठया प्रमाणावर वाढल्या आहे. या विद्यार्थींनीवरील अत्याचाराच्या थांबविण्यात राज्यातील गृहखाते निष्फळ ठरत असल्याचे दिसून येत असल्याचे दिसत आहे.

यावल तालुक्यातील शिक्षण विभागाने जिल्हा परिषद शाळा व इतर खाजगी शाळामध्ये विद्यार्थींनीच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे कम्पलेशन करावे, सर्व शाळांना कम्पाउंड (संरक्षण भिंत) व सुरक्षा रक्षकांची नेमणुक करावी अशा मागणीचे निवेदन तालुका युवा सेनेच्या वतीने निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते व यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. मंजुश्री गायकवाड ( बोरसे) यांना देण्यात आले. या प्रसंगी युवा सेनेचे तालुकाप्रमुख डॉ विवेक अडकमोल , शिवसेना (उबाठा) चे शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, तालुका उपप्रमुख शरद कोळी, शहर उपप्रमुख अजहर खाटीक, शहर उपप्रमुख संतोष धोबी, प्रल्हाद बारी, शकील पटेल, विजय कुंभार, हमीद पटेल यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्त व पदधिकारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound